विद्यार्थ्यांनी ऑनलाइन राहून अग्निपंख ,श्यामची आई यासारख्या पुस्तकाचं वाचन करून आपला सहभाग नोंदवला.
तसेच डॉ अब्दुल कलाम यांच्या जीवनपटावर आधारित प्रश्नावली विद्यार्थ्यांना ऑनलाइन सोडविण्यासाठी देण्यात आली यात 74 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
तसेच डॉ अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित 3 मिनिटांचे वक्तृत्वाचे व्हिडीओ तयार करून विद्यार्थ्यांनी सदर विद्यालयाच्या शैक्षणिक virtual ग्रुप वर अपलोड केले .
याप्रसंगी श्री विनोद सपकाळे सर यांनी डॉ अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा परिचय करून दिला.त्यांच्या विज्ञानवादी, प्रयत्न वादी ,तसेच सतत अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे पैलू प्राचार्य श्री खलाणे सर यांनी उलगडले.याप्रसंगी विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment