*शिवजयंती उत्साहात साजरी*
जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक 19/02/2021 रोजी शिवजयंती उत्सहात साजरी करण्यात आली.विद्यालयाचे प्राचार्य श्री अभिजित खलाणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या शौर्यची गाथा आपल्या भाषणातून प्रकट केली. इयत्ता 8 वी चा विद्यार्थी मंगेश सुदाम पवार याने अफजलखानाचा वध आपल्या पोवाड्यातून सादर केला.तसेच इयत्ता 9 वी व 10 वी च्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या किल्ल्याचे प्रदर्शन भरविण्यात आले त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. उपशिक्षक श्री किरण महाजन सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध यशोगाथा विषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अभिजीत खलाणे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवाजी महाराज यांचे यशोगाथा सांगणारे शिवचरित्र वाचण्याचे व अंगिकरण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिक्षा माळी हर्षदा महाजन या विद्यार्थिनींनी केले व आभार सना शेख हिने व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षिका श्रीमती वैशाली महाजन मॅडम यांनी केले.याप्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते




No comments:
Post a Comment