Saturday, July 8, 2023

जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*

 *जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*



      आज दिनांक ३/७/२०२३ सोमवार रोजी जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहा साजरी करण्यात आली यावेळेस विद्यालयाचे प्राचार्य दादासो श्री अभिजीत खलाने सर अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता बारावी विज्ञान ची विद्यार्थिनी गायत्री महाराज हिने केले तसेच गायत्री पाटील, युवराज पवार आणि कृष्णा पाटील यांनी  गुरुपौर्णिमेबद्दल माहिती सांगितली. तसेच विद्यालयाचे प्राध्यापक श्री अरुण सूर्यवंशी सर यांनी गुरुपौर्णिमेची माहिती व गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती प्रियंका पाटील मॅडम यांनी मानले. यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री निळकंठ पाटील सर तसेच महाविद्यालयाचे शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते

रंग गंधाच्या कार्यक्रमात जय हिंद विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग





 

अशोक खलाणे शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांनी घेतले शिक्षकांंसोबत योगासनाचे धडे





 *अशोक खलाणे शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांनी घेतले शिक्षकांंसोबत योगासनाचे धडे* 


चाळीसगाव:- आज दिनांक २१ जुन २०२३ वार बुधवार रोजी *जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चाळीसगाव* व *सम्राट अशोक प्राथमिक विद्यालय चाळीसगाव* येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस संस्थापक अशोकजी खलाणे यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात विद्येची दैवत सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री, अभिजीत खलाणे हे होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थेचे उपाध्यक्ष श्री. आबासो जगन्नाथ खलाणे हे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून सम्राट अशोक प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती, सोनाली महाजन मॅडम हया होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थेचे उपाध्यक्ष योगाचार्य श्री. आबासो जगन्नाथ खलाणे यांनी २१जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा उददे्श तसेच निरोगी जीवन जगण्यासाठी योगा करणे किती महत्त्वाचे आहे याविषयी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री अभिजीत खलाणे यांनी योग केल्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा कशी निर्माण होते. तसेच योगामुळे आपल्याला तणावमुक्त जीवन कसे जगता येते याविषयी  मार्गदर्शन विदयार्थ्यांना केले. यावेळी सम्राट अशोक प्राथमिक विद्यालयाचे उपशिक्षक श्री विलास बोरसे यांनी योगासनाचे विविध प्रात्यक्षिक करून दाखवले. विद्यार्थ्यांनी वृक्षासन , ताडासन, भुजंगासन, पवनमुक्तातासन इत्यादी आसने केलीत. त्यानंतर प्राणायमचे विविध प्रकार, आनापान घेण्यात आलेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विकास गायकवाड यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगासने व प्राणायाम केले. 

💐🌅🌹👏🙏

ADMISSION OPEN