*जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*
आज दिनांक ३/७/२०२३ सोमवार रोजी जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहा साजरी करण्यात आली यावेळेस विद्यालयाचे प्राचार्य दादासो श्री अभिजीत खलाने सर अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता बारावी विज्ञान ची विद्यार्थिनी गायत्री महाराज हिने केले तसेच गायत्री पाटील, युवराज पवार आणि कृष्णा पाटील यांनी गुरुपौर्णिमेबद्दल माहिती सांगितली. तसेच विद्यालयाचे प्राध्यापक श्री अरुण सूर्यवंशी सर यांनी गुरुपौर्णिमेची माहिती व गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती प्रियंका पाटील मॅडम यांनी मानले. यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री निळकंठ पाटील सर तसेच महाविद्यालयाचे शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते


No comments:
Post a Comment