Tuesday, October 20, 2020

अशोक खलाणे शिक्षण संकुलात आपत्ती व्यवस्थापनावर जीवदान तर्फे शिक्षकांना प्रशिक्षण

आज दि 12/10/2020 सोमवार रोजी जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन या विषयावर प्राध्यापक श्री सतिष सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयात अचानक उद्भवणाऱ्या विविध आपत्तीना कसे तोंड द्यावे तसेच त्या आपत्ती कश्या टाळाव्यात, विद्यार्थ्यी सुरक्षा व प्रथमोपचार कसे करावे

या विषयी माहिती दिली. घरात घटनाऱ्या घटनांचा उल्लेख करून त्याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य श्री अभिजित खलाणे ,सम्राट अशोक प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली महाजन, श्री प्रमोद मोरे उपस्थित होते तसेच सर्व शाखेतील प्राध्यापक, उपशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार श्री सुजित सोनवणे सर यांनी केले.


No comments:

Post a Comment