Saturday, February 29, 2020






*प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नाशिक यांच्यातर्फे इंग्लिश फेअर स्पर्धेत जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे यश*
चाळीसगाव:-
प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नाशिक यांच्यातर्फे इंग्लिश फेअर प्रोजेक्ट पायलट बेसिसवर इंग्लिश टिचर्स वेल्फेअर असोसिएशनच्या व पंचायत समिती चाळीसगाव संयुक्त विध्यामाने तालुकास्तरीय English Fair कार्यक्रमाचे आयोजन सम्राट अशोक विद्यालयात एक दिवसीय इंग्रजी विषयाची उपक्रमांवर स्पर्धा आयोजित केली होती. या ठिकाणी समारोप तथा बक्षिस वितरणाप्रसंगी जळगाव जिल्हा इंग्रजी शिक्षक असोसिएशन चे अध्यक्ष भरत शिरसाट , बी. एन. पाटील , टी. बी. पांढरे , संजय बारी , प्रमोद आठवले , रावलाणी मॅडम , आहिरे मॅडम, एम. आर. चौधरी , गणेश बच्छाव , रंजित सोनवणे , बावरकर मॅडम, वासकर सर, जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिजित खलाणे  हे उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी नाशिक डाएट चे अधिव्याख्याता श्री सोनवणे साहेब व श्री दखणे साहेब यांची प्रमुख उपस्थीती होती. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी चाळीसगाव तालुका इंग्रजी शिक्षक असोसिएशनने परिश्रम घेतले.
एकूण झालेल्या स्पर्धेत चाळीसगाव तालुक्यातून 49 शाळा सहभागी होते व एका शाळेतून किमान चार ते कमान सोळा स्पर्धक सहभागी होते.एकूण तालुक्यातून 600 स्पर्धकांनी सहभागी होते.
यामध्ये प्रमुख मान्यवराच्या हस्ते जयहिंद माध्यमिक विद्यालयास *BEST PERFORMING SCHOOL AWARD* मिळाला. शाळेला  सन्मानचिन्ह देवून सन्मानित केले
१. *सक्सेस स्टोरी व डीसक्शन ऑफ गीव्हन टॉपिकमध्ये – जयहिंद विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला – यशश्री पाटील*
२. *क्विज मध्ये - जयहिंद विद्यालयाचे विद्यार्थी यशश्री पाटील, चेतन परदेशी, चेतन परदेशी यांनी प्रथम क्रमांक मिळवला*
३. *डिजिटल कट्टा मध्ये - जयहिंद विद्यालयाचे विद्यार्थी चेतन परदेशी , प्रशांत लोधी , चेतन परदेशी , रोहित  महाले यांनी द्वितीय कमांक मिळवला.*
४ *पोएम सिंगिग मध्ये – जयहिंद विद्यालयाचे विद्यार्थी सलोनी मोरे व निशा चव्हाण यांनी प्रथम क्रमांक मिळवला.*
५. *शिक्षकांच्या सीपीडी मध्ये जयहिंद विध्यालायाचे इंग्रजी शिक्षक दिनेश अनंत जगताप यांना तृतिय क्रमांकाने गौरविण्यात आले.*
उपरोप्त मिळालेल्या यशस्वी विध्यार्थ्यांचे संस्थापक व सचिव बापुसो अशोक हरी खलाणे व अध्यक्षा लताताई खलाणे उपाध्यक्ष जगन्नाथ हरी खलाणे व प्राचार्य अभिजित जगन्नाथ खलाणे यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कार्मचारींनी आभिनंदन केले.




No comments:

Post a Comment