
चाळीसगाव येथील जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक- 9/1/2020 वार गुरुवार रोजी बक्षीस वितरण व विद्यार्थी निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री सुधीर तांबे, आमदार नाशिक विभाग तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री भैय्या सो ऍड संदीप पाटील जिल्हाध्यक्ष काँग्रेस, आय प्रमुख अतिथी माननीय श्री. दादासो लक्ष्मीकांत साताळकर, प्रांताधिकारी चाळीसगाव श्री विलास भोई गटशिक्षणाधिकारी चाळीसगाव, आबासो जगन्नाथ खलाने उपाध्यक्ष महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ चाळीसगाव, दादासो रविंद्र निकम, बापुसो अशोक खलाने संस्थापक, महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ चाळीसगाव, तसेच संस्थेच्या अध्यक्ष ताई सो. लता खलाने, दादासो नगराज वाघ संचालक, महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ चाळीसगाव, या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक श्री अशोक खलाने यांनी विद्यार्थ्यांना मेहनत करून जीवन उज्वल करण्याचे मार्गदर्शन केले,चालीसगाव चे प्रांताधिकारी श्री. लक्ष्मीकांत सातळकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व त्याचे स्वरूप सांगितले जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टाला पर्याय नाही तसेच सर्वांना शुभेच्छा दिल्या.तसेच या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर सुधीर तांबे यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील रोजगाराच्या वाटा व संधी याबद्दल माहिती सांगितली तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे भय्यासाहेब संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी व बारावी नंतर असणाऱ्या विविध विभाग व शिक्षण क्षेत्रातील वाटा याबद्दल माहिती सांगितली व भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अरुण सूर्यवंशी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.


No comments:
Post a Comment