जयहिंद मा. व उच्च माध्य. विदयालयात आषाढी एकादशी निमित्ताने वृक्षदिंडीचे व पालखी सोहळा चे आयोजन करण्यात आले
दिनांक ११/०७/२०१९वार गुरुवार रोजी जयहिंद मा. व उच्च माध्य. विदयालयात आषाढी एकादशी निमित्ताने वृक्षदिंडी व पालखी सोहळा चे आयोजन करण्यात आले. दिंडी चे उदघाटन जयहिंद मा. व उच्च माध्य. विद्यालयाचे प्राचार्य दादासो. ए. जे. खलाने सर व सम्राट अशोक प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिक श्रीमती. एस. डी. महाजन मॅडम यानी केले. यानंतर दिंडी पुलावरून हनुमानवाडी या ठिकाणी मार्गस्थ झाली. यामध्ये इयत्ता ५वी ते १०वी चे विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला व वारकरी नृत्य सादर केले.या प्रसंगी संस्थेचे चेअरमन मा. बापू साहेब अशोकजी खलाणे,अध्यक्षा ताई साहेब लता खालाणे ,नगरसेवक आबासो. सोमसिग राजपूत ,पालक,परिसरातील नागरिक याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले ,व विद्यार्थाना वृक्षसंवर्धन करण्याबाबत आव्हान करण्यात आले. यानंतर शिंदी कॉलनी-रेल्वे स्टेशन के. के .मुश बंगल्या जवळ सर्व विद्यार्थाना केळी वाटप करण्यात आली. व स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. या नंतर गजानन कॉलनी विद्युतसरिता कॉलनी या मार्गी पालखी मिरवणूक करण्यात आली. स्वामी समर्थ केंद्राजवळ ग्रामस्थाच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याठिकाणी विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबर आध्यत्मिक ज्ञानाची जाणीव करून देण्यात आली,सामाजिक संदेश देत त्या नंतर परत शाळेच्या प्रगणात पालखीची सांगता करण्यात आली.सदर सोहळा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.

No comments:
Post a Comment