Saturday, May 20, 2017

जळगाव शहराचा इतिहास

आजचे जळगाव महानगर हे पूर्वी 19 व्या शतकात म्हणजे 1862
सालापर्यत खान्देश ( धुळे ) जिल्हातील नशिराबाद तालुक्यातील जळगाव
बु।।. म्हणून ओळखले जाणारे छोटेसे गांव होते. आज जळगांवातून केळी,
मेहरूणची बोरे, कापुस, ओरिंएट सिमेंट, सुप्रीम पाईप, जैन पाईप भारताबाहेर
पुरविण्यार्या जळगाव शहराला तसा फारसा प्राचीन इतिहास नाही. एकाही
ग्रंथात जळगांव चे नाव आढळत नाही. जळगांवची मूळ जूनी वस्ती
गोपाळपूरा ही होय.
जळगाव मिरर
जिल्हातील फैजपुर, चोपडा, धरणगाव, अमळनेर, एरंडोल इत्यादी गावांची
नावे इतिहासात आढळतात. जळगांव शहराच्या परीसरातील कापसाचे प्रचंड
उत्पादन परदेशात (इंग्लंड) पाठविण्याच्या हेतूने इंग्रजांनी 1852 साली
ठाणे ते भुसावळ रेल्वेमार्ग निर्माण केला. या रेल्वेमार्गावर जळगांवचे
स्थान आल्याने खर्या अर्थाने जळगांवचे भाग्य बदलले व जळगांवच्या
विकासास चालना मिळाली. जिल्हाचे व तालुक्याचे मुख्यालय नशिराबादहून
जळगांवी आले. विकसाची गती तेव्हापासुन आजपर्यत कायम आहे. नंतर
1862 साली जळगांव नगरपालीकेची स्थापना झाली. तद्नंतर मुंबईच्या
मुलजी जेठा कंपनीने खान्देश मीलची स्थापना केली स्व:ताच्या नावाने
भव्य मु. जे. महाविद्यालयाची स्थापना केली नंतर बँका, सहकारी संस्था,
1906 साली स्वतंत्र नेतृत्वासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची स्थापना
झाली. अनेक शालेय संस्था, कार्यालये, औद्योगिक वसाहत, उत्तरोत्तर
जळगांवचा विकास होऊ लागला. जळगांव नगरपालीकेचा विकास कामामुळे
आज शहरातील महानगरपालीकेची 17 मजली इमारतीने जळगांवचे वैभव
भारतभर नेले. 19 व्या शतकातील एका लहानशा खेड्याचे रुपांतर 21 व्या
शतकात महानगर झाल्याने जळगांवचा इतिहास पूर्णपणे वैभवशाली झाली
आहे.
जळगाव मिरर
 जळगांव शहर.....
१८६०. सुरत-भुसावळ. रेल्वे सुरु झाली...
१८६२. जळगांव येथे कॉटन मार्केट सुरु झाले.
८.मार्च १८६४.रोजी नगरपालीकेची. स्थापना झाली.
२४.डिसेंबर १८६४रोजीनगरपालीकेची पहिली सभा झाली
मेहरुण तलाव ते रथचौक लोखंडी पाईप टाकुन जळगांवला सरळ तलावाचे पाणी पुरवले जात असे.
१८६९.आप्पा महाराजांनी श्रीराम मंदीराचा जिर्णोद्धार केला
१८७१.जळगांव शहराची पहिली जनगणा झाली लोकसंख्या ६८९३.
१८७२.श्री आप्पा महाराजानी मुक्ताईची पालखि सुरु केली.
१८७४,खांन्देश मिलचा पाया घातला गेला .
१८७५.पहिली मराठी शाळा व लायब्ररी सुरु.
१८७६.पहिला दवाखाना सुरु.
१८७७.वल्लभदास वालजी वाचनालय व टाऊन हॉल सुरु झाले
१८८०.पहिले साप्तहीक प्रभोधचंद्रीका सुरु झाले
१८८३.श्री आप्पा महाराजानी राम मंदीराचा वापर शाळे साठी सुरु केला
१८८५. म्युन्सिपल स्कुल बोर्ड सुरु झाले व जळगांव तालुका झाला.
१९०७ जळगांव जिल्हा निर्मिती
१९०८.श्री म्हाळस नगरपालीकेचे पहिले नगरअध्यक्ष
१९०९.बँक अॉफ बॉम्बे सुरु झाली.
१९१०.जळगांवला टेलीफोन सेवा सुरु
१९२५ ते १९२८.बॉम्बे बरोज म्युन्सिपल अॉक्ट लागु झाला व १० लाखघनफुट क्षमतेचे गिरणा वॉटर वर्क्स योजना कार्यान्वीत.
१९३१.पहिले विद्युत केंद्र सुरु.
१९४२.पहिली टाऊन प्लॉनिंग स्कीम झाली
१९५८.नगर रचना मास्टर प्लॉन-विकास आराखडा मंजुर
१९५९.प्रथमची हद्द ४,१०,चौरस मैल.
१मे१९६०.संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती.
जळगांव जिल्हा म्हणुन मान्यता.
शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालय.
१९६२-६३. टी.बी. सॉनेटीरीयम. बालगंधर्व खुले नाट्य ग्रुह रामपेठेत मराठी शाळा व भुयारी गटार योजना
१९६५. महाराष्ट्र नगरपालीका अधिनियम १९६५.लागु
१९६६ तुकाराम श्रीपत चौधरी (कांती शेठ यांचे वडील) न.प. अध्यक्ष. शनिपेठेत हरीजन कॉलनी न प कर्मचार्यासाठी घरकुले दिली
१९६७,१२०.घरकुले नवलनगर व गुरुनानक नगर.
१९७१.न. प. हद्द वाढ ५चौ.कि मी वरुन ८चौ.कि मी.
१९७४विकास आराखडा दुरुस्त
१९७६.१-१०-७६रोजी८चौ.कि.मी. वरुन १२.४४कि.मी
१९७९.जिल्हापेठ पोलीस स्टेशन निर्माण
१९-९-८७ हद्दवाढ १२.४४कि.मी वरुन ६३,२९चौ.कि. मी
१५-८-९० उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ सुरु
६-१-९३.फायनल टाऊन प्लॉनिंग स्कीम मंजुर
२१-३-२००३ जळगाव शहर महानगरपालीका स्थापन

No comments:

Post a Comment